Shirdi : साई मंदिरात ग्रहण काळात मंत्रोपच्चाराचा जप

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिर्डी : यंदाचे सूर्यग्रहण हे सुमारे 25 वर्षातील सर्वात मोठे ग्रहण होते तर या ग्रहणाचा परीणाम म्हणून शिर्डी साई मंदिराच्या दैनंदिन धर्मिक कार्यक्रमातही बदल करण्यात आले होते. तर ग्रहणाचे तब्बल चार तासात मंत्रोपच्चाराचा जप करण्यात आला.

1995 साली असेच सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाचा काळ हा धर्म शास्त्रात अशुभ काळ मानला जात असतो. या काळात कोणतेही शूभ केले जात नसते. म्हणून शिर्डीच्या साई मंदिरातील साई बाबांच्या समाधी ही दूर्वांकूर व तुळशीपत्राने आच्छिदण्यात आलेली होती. याचे अच्छादन केल्यावर समाधीवर कुठलाही वाईट प्रभाव ग्रहणाचा पडत नाही, असे मंदिराकडून सांगण्यात आले आहे. बाबांच्या मूर्तीला शुभ्र कपडे परीधान करण्यात आले होते. तर मूर्तीच्या गळ्यात रुद्राक्षाची माळा घालण्यात आली होती.

रविवारी होणारी मध्यान्ह आरती ही ग्रहण काळात आली असल्याने दीड वाजेच्या सुमारास बाबांच्या मूर्तीला पुन्हा मंगलस्नान घालण्यात आले. तर सुमारे अडीच वाजेच्या सुमारास माध्यान्ह आरती झाली. या ग्रहणाच्या दरम्यान मंदिर पुजा-यांनी मंदीराच्या गाभा-यात अथर्वशिर्ष, रुद्राआवरतन, स्तवन मंजिरी, विष्णू सहस्त्रनाम, नवग्रह मंत्राचे पठण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here