अशोक उद्योग समुह व अशोक शैक्षणिक संकुलच्यावतीने योग दिन

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर : भारतभर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने अशोक उद्योग समुह व अशोक शैक्षणिक संकुलाच्यावतीने सोशल डिस्टेनसिंगचे नियम पाळून अशोकनगर व प्रगतीनगर येथे माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अशोक शैक्षणिक संकुलाच्या अशोक आयडियल स्कूल व अशोक इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने प्रगतीनगर येथे योगदिन साजरा करण्यात आला. अशोक उद्योग समुहाचे प्रणेते माजी आ. भानुदास मुरकुटे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या समन्वयक मंजुश्री मुरकुटे यांच्या उपस्थितीत योग प्रशिक्षक उदय वाणी व उद्धव आहेर यांनी यावेळी योगासना विषयी माहिती देवून विविध प्रकारचे योगासने प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख, इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य डॉ. माधव पगारे यांचेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी योगदिनात सहभाग घेतला. तसेच अशोकनगर येथे अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयातही प्राचार्य प्रा. अंजाबापू शिंदे, उपप्राचार्य अरुण कडू यांचे उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला.
त्याचबरोबर अशोक महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉ. गोरख बारहाते व उपप्राचार्या प्रा. सुनिता गायकवाड यांच्या उपस्थितीत योगदिन संपन्न झाला. यावेळी कार्यालय अधिक्षक बाबासाहेब पटारे, क्रीडा शिक्षक प्रा. दिलीप साळुंके, प्रा. विवेक साळवे, प्रा. सुयोग थोरात, प्रा. दिलीप खंडागळे यांचेसह प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते. तसेच भास्करराव गलांडे पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही कार्यालयीन अधिक्षक दत्तात्रय झुराळे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या उपस्थित योगदिन साजरा करण्यात आला.
अशोक उद्योग समुहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावरील मैदानावर कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कारखान्याचे अधिकारी आप्पासाहेब दुशिंग, निलेश गाडे, नारायण चौधरी, भगवान काळे, बाळासाहेब उंडे, संभाजी झाडे, कृष्णकांत सोनटक्के, भाऊसाहेब दोंड, बाळासाहेब राऊत, रमेश आढाव यांचेसह कामगार उपस्थित होते. यावेळी योगाचे विविध योगासने करुन योगदिन साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here