Beed : जिल्ह्यातील या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन; संचारबंदी लागू – जिल्हाधिकारी रेखावार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
बीड शहरातील शहेनशाह परिसर पाटोदा शहरातील माळी गल्ली येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.


जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी याबाबत अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरातील शहेनशाह येथील रशीद इंजिनियर यांच्या घरापासून ते खालिद अब्दुल यांचे घरापर्यंत या परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here