Crime : नऊ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
हंडीनिमगाव – तालुक्यातील सौंदाळा येथील ९ वर्षीय चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यूने रविवारी (२१ जून) तालुक्यात खळबळ उडाली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नेवासा शेवगाव महामार्गावरील सौंदाळा गावातील इयत्ता चौथीमध्ये शिकणारी मुलगी शनिवारी (दि.२०) रात्री घरात झोपली होती. रविवारी सकाळी आई-वडील शेतातून घरी आल्यावर तिला झोपेतून उठविले असता ती झोपेतून उठली नाही. सर्पदंश झाला असेल असे समजून तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरने तपासून ती उपचारापूर्वी मयत झाल्याचे नातेवाईकांना सांगितले.

नेवासा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत मुलीच्या पायावर जखमा दिसून आल्या असून शरीर काळे-निळे पडल्याचे आढळून आले. श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, सहाय्यक निरीक्षक भारत दाते यांचे पथकाने सौंदाळा येथील घटनास्थळी जाऊन पाहणी करून मयत मुलीचे आई-वडील व इतर नातेवाईकांची सुमारे तासभर कसून चौकशी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here