Suicide Attempts : Pune : तीन दिवसांत 10 जणांंनी संपवली जीवन यात्रा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पुण्यात आत्महत्येच्या घडलेल्या घटनांवरून आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अवघ्या तीन दिवसांत 10 जणांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. 

केईम रुग्णलायाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका आईने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तिच्या 13 वर्षीय मुलाचे या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, या महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

तर 19 जूनला एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली होती. आपल्या चिमुकल्यांना गळफास देऊन नंतर दाम्पत्याने स्वतः आत्महत्या केली होती. आर्थिक अडचणींमुळे इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

तर एका सेक्युरिटी गार्डनेही गळफास लावून आपले जीवन संपविले होते. हा धक्का सहन न झाल्याने त्याच्या पत्नीने त्यापाठोपाठ स्वतःचे आयुष्य संपवले. रास्तापेठ येथे ही घटना घडली होती. सिंहगड रोडवरील एका मंडप व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार केले. तर कित्येकांचे व्यवसाय बुडाले आहेत. त्यामुळे सध्या अनेक जण आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अनेकांच्या घरात उपासमार सुरू आहे. तर काहींना आई जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना, अशी गत आहे. या सर्व कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचा, अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here