प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

जाफराबाद – तालुक्यातील अति महत्वकांक्षी असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायत अंतर्गत जे बी के विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्ती पैकी ९ कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दक्ष प्रशासनाने तातडीची मिटिंग बोलावून टेंभुर्णी तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेले 33 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार तहसीलदार सतिश सोनी यांनी तात्काळ टेंभुर्णी पोलीस स्टेशन आवारात तालुका आरोग्य अधिकारी सोनटक्के, ठाणेदार डी एस पायघन, ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णीचे डॉ. प्रकाश साबळे, तलाठी धनवई , ग्रामसेवक शेळके सह जे महत्वाच्या कोरोना सर्वे करतात, अशा आरोग्य सेविका यांची प्रसंगवधान मिटिंग बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला.
चर्चेदरम्यान प्रशासनाकडून मंगळवार, बुधवार, गुरुवार तीन दिवस मेडिकल, हॉस्पिटल वगळता सर्व बंद करण्याचे आदेश दिल्या गेले. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी टेंभुर्णीतील बँक बंद ठेवून आपल्या बी सी मार्फत नेमून दिलेल्या गावानुसार तात्काळ सोशल डिस्टन्स ठेवून कार्यरत असावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, असेही सोनी यांनी ग्रामपंचायतला निर्देशित केले. अति तात्काळ मिटिंगसाठी गट विकास अधिकारी यांची अनुपस्थिती जाणवली.