Akole : पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

4
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अकोले – पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात बुडून ३० वर्षीय सुनील मोहना घाटकर या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अकोले पोलिसात मारुती डुमा बालसिंग (रा.पळसुंदे ता.अकोले) यांनी खबर दिली आहे. यानुसार आज सोमवारी (दि २२) सकाळी सहापूर्वी तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात पोरेवाडी(पांगरी) शिवारात पाण्यात बुडून मयत अवस्थेत घोटकरवाडी, येसरठाव (ता.अकोले) येथील सुनील हा इसम मिळून आला आहे.
यावरून अकोले पोलिसांनी आकस्मित मृत्यू कलम- ६५/२०२०  सी.आर. पी.सी. १७४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवलदार पालवे करत आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here