Shrirampur : शाळेच्या बैठकीकडे पालकांनी फिरवली पाठ

पालकांना निमंञनच नाही, पालकांचे मत विचारात घेतल्या शिवाय शाळा सुरु करायची नाही

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | राजेंद्र उंडे

श्रीरामपूर – देवळाली प्रवरा येथील छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीकडे पालकांनी पाठ फिरविली तर उपस्थित असणाऱ्या प्रतिष्ठीत नागरिकांनी पालकांची मत विचारात घेतल्या शिवाय शाळा सुरु करु नये, असा निर्णय घेतला असून शाळेतून पालकांना माञ शाळा सुरु करण्या बाबतच्या बैठकीचा निरोप देण्यात आला नसल्याची तक्रार पालक वर्गातून करण्यात आली आहे.

शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी शाळा व्यवस्थापन, पालक, आरोग्य विभाग, नगर पालिका आदींची बैठक समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान शेटे, माजी नगराध्यक्ष व पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष गोरखराव मुसमाडे, नगरसेवक आण्णासाहेब चोथे, संजय बर्डे, बाळासाहेब खुरुद, संगिता चव्हाण, सुजाता कदम, मुख्याधिकारी अजित निकत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जाकीर शेख, मच्छींद्र कदम, दिलीप मुसमाडे, सोपान भांड, अजिज शेख, भाऊसाहेब वाळुंज, प्राचार्य एल.डी.क्षीरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी पालक वर्गातून गौतम भागवत,राजेंद्र चव्हाण,मच्छींद्र मुसमाडे,संजय सिनारे आदी उपस्थित होते.2 हजार 442 विद्यार्थ्यांनच्या पालकापैकी अवघे 4 पालक उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाचे समन्वयक प्रा. बाबा चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की,शाळा सुरु करण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक आंतर पाळण्याची सवय लावावी लागेल. एका वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी बसावा लागेल. ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी व्यवस्था करणे गरजेचे आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णया नंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे प्रा.चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, शाळा बंद ठेवू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. या बैठकीत पालकांची उपस्थिती नाही.मान्यवरांना निरोप दिल्याची यादी आमच्या समोर ठेवली.परंतू पालकांना निरोप दिल्याची यादी माञ आमच्या समोर ठेवण्यात आली नाही. शाळेने पालकांना जर निरोप देवून पालक येत नसेल तर शाळा बंद ठेवा. परंतू शाळेतून पालकांना निरोप गेलेत का याची माझ्यासह सर्वांनी खाञी करावी. 80 टक्के पालक विद्यार्थी आँनलाईन अभ्यासक्रमात सहभागी आहेत. शाळा सुरु करण्या बाबत पालकांची मते जाणून घ्या. हुकुमशाही करायला शहरात कोणीच कमी करत नाही.सर्व नियमांचे पालन होणार असेल तरच शाळा सुरु करावी असे कदम यांनी सांगितले.

यावेळी माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, शाळा चलू करण्याची घाई करु नये लाँकडाऊनच्या काळात नगर पालिकेने चांगले काम केले. विद्यार्थ्यां बरोबर पालकांची मते विचारात घेतली पाहिजे दहावी,अकारावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याची शिक्षकांची मागणी आहे. परंतू काही लोक चांगल्या कामाला विरोध करतात.त्यामुळे सर्वांची मते विचारात घेवून निर्णय घ्यावा असे कदम यांनी सांगितले.

नगरसेवक बाळासाहेब खुरुद यांनी शहरातील काही विद्यार्थी यावर्षी बारावी करीता  शहरातच शिक्षण घेवू इच्छीत  आहेत.त्यांना बारावीत प्रवेश द्यावा अशी मागणी केली असता पालक शिक्षक संघाने बारावीत प्रवेश देता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले.

पालकांना निरोप दिले का ? कदम
शाळा सुरु करण्या बाबत निर्णय घेण्यासाठी पालकांना निरोप देण्यात आले का? निरोप दिले तर पालक उपस्थित का राहिले नाही. का पालकांना निरोप दिलेच नाही.पालकांशी संवाद झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये.शाळेतील 95 टक्के शिक्षक नगर येथून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका पोहचू शकतो.त्यामुळे पालकांची संमती महत्वाची आहे
शहाजी कदम, माजी अध्यक्ष  पालक शिक्षक संघ

नेहमी प्रमाणे पालक आले नाही; क्षीरसागर
शाळा सुरु करण्या संदर्भात 2 हजार 442 विद्यार्थ्यांपैकी 25 पालकांना निरोप देण्यात आले होते.परंतू पालक नेहमी प्रमाणे आलेच नाही. सामाजिक अंतर ठेवण्यासाठी व आसन व्यवस्था या नुसार पालकांना निरोप दिले परंतू  ते आलेच नाही.
–  एल.डी. क्षीरसागर  प्राचार्य श्री.छ.शि.मा.व.उच्च मा.विद्यालय

कोणत्याही पालकांना निरोप दिलाच नाही.
शाळा सुरु करण्यासंदर्भात  बैठक आयोजित करण्यात आली आहे. माझी मुलगी या शाळेत शिक्षण घेत आहे. बैठकीची शाळेकडून कोणतीही माहिती अथवा निमंञन दिले नाही.शाळेचे शिक्षक साफ खोटे बोलत आहेत.निरोप दिल्याचे पञ किंवा कुठे स्वाक्षरी शिक्षकांनी दाखवून द्यावी. पालक विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळ देवू शकतात पण शाळेकडून निरोप दिला जात नाही.शाळेने शाळा व्यस्थापन समिती  व पालक शिक्षक संघास खोटी माहिती दिली आहे.
मच्छींद्र उदावंत पालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here