प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

पुणतांबा : येथील पुणतांबा- कोपरगाव रस्त्यावर पुणतांब्यापासून अंदाजे १ किमीवर अंतरावर असलेल्या डेरा नाला येथे मंगळवारी सायकाळी सहा वाजेच्या दरम्यान मंहिद्र पिकअप टेम्पो अडवून गाडीचे चालक व क्लीनर यांना धाक दाखवून त्यांच्याकडून अंदाजे रोख अडीच लाख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मालेगाव येथून पांढऱ्या रगांच्या पिकअप टेम्पोने श्रीरामपूर येथे शेंगदाण्याची पोती खाली केली होती व मालाचे पैसे घेऊनही टेम्पो पुणतांबा मार्गे कोपरगाव कडे निघाला होता. पुणतांब्याच्या पुढे डेरा नाल्याजवळ तीन मोटारसायकल आलेल्या पाच व्यक्तींनी टेंम्पो जबर दस्तीने थांबविला व त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली, चालकाने भितीने सीट खाली ठेवलेली रक्कम काढून दिली. हा प्रकार चालू असतांना गाडीला कट मारल्यामुळे रस त्यावर वाद चालू असावा, असा येणाऱ्या जाणाऱ्या चा समज झाल्यामुळे कोणीही भाग घेतला नाही, मात्र चोरटे पसार होताच चालक व क्लीनरने आरडाओरडा केल्यामुळे लोकांना वस्तुस्थिती समजली. विशेष म्हणजे पाचही चोरटे धष्टपुष्ठ होते व रक्कम घेऊन ते शिर्डीच्या दिशेने पळाल्याचे समजते.
अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आरोपींचा शेध तातडीने सुरू केला. राहता पोलिसांकडे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.