Shrigonda : सख्ख्या चार भावांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील बाबुर्डी गावात शेत तळ्यात पोहायला गेलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नमूद दुर्घटना मंगळवारी (२३ जून) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत्युमुखी पडलेले चारही जण सख्खे भाऊ असून, ते परप्रांतीय असल्याचे समजते आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेशातील काही लोक आपल्या कुटुंबासह बाबुर्डी येथील एका गुऱ्हाळावर कामाला आहेत. तशी त्यांचे दोन, तीन कुटुंब या ठिकाणी काम करतात. कोरोना संक्रमनात यांनी मायदेशी जाणे पसंत न करता, येथेच काम करून गुजराण करण्याचे ठरविले होते. त्यानुसार ते नमूद ठिकाणी राहत होते. आज येथील एका कुटुंबातील मुले आई, वडिलांना न कळविता शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेले. पाण्यात जाताना आधाराला ठिबकचा पाईप घेतला होता. मात्र, तो तुटल्याने ते पाण्यात पडून पोहता न आल्याने त्या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. साधारण १६ ते २२ वर्षे वयो गटातील हे मुले असून, परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिकांच्या मदतीने या चारही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून, पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here