Ahmednagar Breaking : Corona Updates : 2 वर्षाचा चिमुकला व 90 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेसह जिल्ह्यात 20 जण पॉझिटिव्ह

2

नगर शहरातील दिल्लीगेट, तोफखाना, बालिकाश्रमरोड भागातून आढळले रुग्ण,
कोरोनामुक्त जामखेडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; संगमनेर आणि श्रीरामपूरकरांचीही चिंता वाढली

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर – जिल्ह्यात 2 वर्षाच्या चिमुकला आणि 90 वर्षीय आजीसह 20 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे अहमदनगरकरांची चिंता वाढली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात सकाळच्या सत्रात १० रुग्ण वाढल्यानंतर आणखी नव्याने १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नगर शहरातील सात, संगमनेर २ आणि श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५८ झाली असून एकूण रुग्ण संख्या ३२४ इतकी झाली आहे तर २५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०४, दिल्ली गेट भागातील ०२ आणि बालिकाश्रम रोड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तोफखाना भागातील रुग्णामध्ये २ वर्षाचा मुलगा, ३५ आणि ४६ वर्षीय पुरुष, ९० वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. दिल्ली गेट भागातील रुग्णामध्ये १३ वर्षीय मुलगा आणि ३३ वर्षीय महिला बाधित आढळली आहे. बालिकाश्रम रोड येथील ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील ४० वर्षीय पुरुष आणि नवघर गल्ली येथील २६ वर्षीय युवकाचा समावेश आहे. याशिवाय, श्रीरामपूर येथील ३८ वर्षीय पुरुष जामखेड येथील एक 30 वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here