Karjat Breaking Crime : मिरजगावमध्ये दरोडा; तलवारीच्या धाकाने वकिलाला तीन लाखांना लुटले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मिरजगाव येथील शिंगवी काॅलनीत आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धूमाकूळ घातला. सात ते आठ जण असलेल्या चोरट्यांनी येथील रहिवासी अॅड.मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वार जवळील किचन रूमचा दरवाज्याचा कडी, कोयंडा कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये झोपेत असलेल्या अॅड. कोरडे दाम्पत्यांना तलवारीचा धाक दाखवून घरातील कपाटातील नऊ तोळे सोने व चांदीचे काही दागिने अंदाजे तीन लाखांचा ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती समजताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस यंत्रणेकडून वेगाने तपासाचे चक्र फिरविण्यात आल्याने तपास सुरू झाला आहे. घटनास्थळी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, गृहविभागाचे उपअधीक्षक प्रांजली सोनवणे, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक अमरजित मोरे, सुरेश माने यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी श्वानपथक फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

मिरजगाव येथील शहराच्या मध्यभागी असलेल्या या वस्तीमध्ये चोरी झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरजगाव परिसरात व शहरातील काही भागामध्ये ही मागील काही दिवसापासून चो-याचे प्रमाण वाढले असून शहरामध्ये व राज्य महामार्गावरील पोलीस ग्रस्त सुरू करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.

...5 संशयित ताब्यात
घटना घडल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरल्याने काही तासातच गुन्हा अन्वेषण विभाग, आरसीपी व कर्जत पोलीस या संयुक्त पथकाने कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील एका वस्तीवरून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामुळे सदर घटनेचा तपास लागण्यास आणखीन मदत होईल, अशी माहिती कर्जतचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here