Crime : Jamkhed Breaking : पाठीमागचा दरवाजा कटावनीने तोडून घरफोडी; दोन लाखांसह 22 तोळे सोने लंपास

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जामखेड – येथील पोकळे वस्तीवरील तात्याराम पोकळे यांच्या घराचा पाठीमागचा दरवाजा कटावनीने तोडून घरफोडी करण्यात आली. घटनेत दोन लाखांसह 22 तोळे सोने चोरट्यांनी लुटले आहे. आज बुधवारी पहाटे एक ते तीनच्या दरम्यान ही चोरी झाली. 

घरातील सर्वजण गाढ झोपेत असल्याचे लक्षात घेऊन चोरट्यांनी कटावनीने पाठीमागचा दरवाजा तोडून ही चोरी केली. तात्याराम यांच्या आई पहाटे ऊठल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर ही चोरी उघडकीस आली.

घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश माने, अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेनंतर जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here