Newasa : पीक कर्ज तातडीने वाटप करा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी तसेच पीक कर्ज घेताना एकत्रित ८अ उताऱ्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. या मागणीसाठी भाजपा नेवासा तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार बाळासाहेब मूरकुटे यांच्या मार्गदर्शनखाली नेवासा तालुक्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या संकटाबरोबरच राज्य सरकार शेतकर्‍यांसाठी कुठलाच ठोस उपाययोजना राबवित नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे योजनेचा बोजवारा उडाला आहे. कापसाची खरेदी न झाल्याने कापूस घरामध्ये पडून असून नाईलाजास्तव कमी भावात कापूस विकावा लागत आहे. कापूस, चणा, तुरीचे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला असून सावकारांकडे दागिणे गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात भाजपाने आंदोलन केल्यानंतर शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये निधी देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु ती घोषणा अंमलात आली नाही. तसेच बांधावर जाऊन कोरडवाहू शेतकर्‍यांना 25 हजार तर फळबागा असलेल्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये देण्याच्या घोषणेचा सरकारला विसर पडला असून शेतकर्‍यांंच्या अडचणी तात्काळ सोडावाव्यात या मागणीसाठी भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी दिलीप पवार, शहर अध्यक्ष मनोज पारखे, सुनील भाऊ वाघ, सुभाष पवार, सतीश गायके, प्रफुल जाधव युवानेते निरंजन डहाळे, आदिनाथ पटारे, तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here