Ahmednagar Breaking : Corona Updates : नगर शहरात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह; दुपारपर्यंत जिल्ह्यात 24 रुग्ण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नगर : शहरात आज सकाळी १५ जणांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर येत असतानाच आणखी तीन रुग्णांची त्यात भर पडली आहे. रासनेनगरमधील २ तर लेंडकर मळ्यात एकाचा यात समावेश आहे.

रासनेनगरमधील १५ वर्षाचा मुलगा व ४८ वर्षाच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लेंडकर मळ्यातील ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. संगमनेरमधील आणखी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज दुपाारी दीड वाजेपर्यंत दिवसभरात २४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, रासनेनगर येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने शहरातील संपूर्ण प्रोफेसर कॉलनी परिसर आज दुपारनंतर सील करण्यात आला आहे. दिल्लीगेट, तोफखाना, बालिकाश्रम भागात रुग्ण आढळल्याने लवकरच हाही परिसर सील करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here