Karjat : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या @ १०

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कर्जत : अळसुंदे (ता.कर्जत) येथील ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कर्जत शहर आणि तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. सदरची कोरोनाबाधीत महिलेचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत सकारात्मक आला असून  अहमदनगरमधील खाजगी रुग्णलयात ती उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली आहे. तिच्या संपर्कातील १३ व्यक्ती तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णाची एकूण संख्या १० झाली आहे.

बुधवार, दि २४ रोजी अळसुंदे (ता.कर्जत) येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल खाजगी प्रयोगशाळेत सकारात्मक आला असून ती अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली.
यावेळी तालुका प्रशासनाने तात्काळ अळसुंदे येथे धाव घेत सदर महिला राहत असलेला भाग प्रतिबंधित करण्याचे सूत्रे हाती घेण्यात आली. सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णाची एकूण संख्या दहा झाली आहे. तिच्या संपर्कातील १३ व्यक्ती प्रशासनाने तपासणीसाठी अहमदनगर येथे रवाना केले आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णाच्या संख्येने द्वि आकडा पार केल्याने कर्जत शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे. व्यवसाय तसेच महत्वाच्या कामानिम्मित कर्जत शहरात अळसुंदे येथील नागरिक येत असल्याने कर्जतकराची सुद्धा धाकधूक वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here