Agriculture : Shirurkasar : तालुक्यातील 49 गावांच्या शेतकऱ्यांना पिक विम्यातून वगळल्याने संताप

2
अतिवृष्टीने झालेले नुकसान
शेतकरी करणार तीव्र आंदोलन
प्रतिनिधी | जगन्नाथ परजणे। राष्ट्र सह्याद्री 
अॅग्रीकल्चर या इन्शूरन्स कंपनीने मागील वर्षी शेतकऱ्यांचा पिकविमा भरून घेतला. परंतू तालुक्यातील रायमोहा, तिंतरवणी या दोन महसूल मंडळातील तब्बल 49 गावांना सुरुवातीला पावसाचा खंड अन् नंतर अतिवृष्टी झाली असताना पिक विम्यातून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून हक्काचा पिकविमा मिळावा म्हणून तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकरी करणार आहेत.

शिरूरकासार तालुक्यातील शेतकरी गेली सात ते आठ वर्षांपासून निसर्गाच्या अस्मानी सुलतानी संकटामुळे व्याकूळ झाला असताना कर्जाचा डोंगर घेऊन कसाबसा जिवन जगत आहे. त्यातच अनेक शेतकरी राजाने आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्हा पूर्वपासून अत्यंत मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच शिरूरकासार तालुका अति मागासलेला आहे. अवर्षण असलेला हा भाग नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतो. गेली सात ते आठ वर्षाचा दुष्काळाच्या झळा सोसतासोसता शेक-याच्या नाकी नऊ आले असल्याने बळीराजा हतबल झाला असून मागील 2019 रोजी तालुक्यातील याच बळीराजाने आपल्या हक्काचा पिकविमा खरिपाच्या हंगामात भरला.

अल्पशा पावसावर पुढील पावसाची आशा धरून कापूस तूर व ईतर पिके घेतली परंतु नंतर पावसाचा एक महिना खंड झाला. रिमझिम पावसावर पिके गुडघ्यापर्यंत आली. मात्र, नंतर10-15बोंडे होती नंतर अतिवृष्टीने कहर केला. यात सर्व काही गेले. मात्र, शिरूरकासार तालुक्यात तिन मंडळ आहेत. त्यामध्ये एकाच मंडळावर पिकविमा जाहीर केलाच कसा?प्रशासकीय अहवाल दुष्काळ जन्य असताना दोन मंडळातील 49 गावं वगळलीच कशी? कंपनीने अतिवृष्टी झाल्यावर प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत पंचनामे ऑनलाईन केले मग झालं काय? याचेही उत्तर विमा कंपनीने द्यावे, अशी मागणी असून 49 गावांमधील शेतकरी संतप्त झाला असून लवकरच तीव्र आंदोलन करणार आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here