Shirdi : अवघ्या दोनशे रुपयासाठी मजुराचा खून

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
 
शिर्डीत मोलमजुरी करणाऱ्या त्याच्याच मित्राकडून घेतलेले दोनशे रुपये दिले नाही. याचा राग आल्याने त्या मजुरांच्या मित्राने पैसे दिले नसल्याच्या कारणावरून त्या मजुरांचा (दि.२२) चाकूने भोसकून खून केला होता. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतांना (दि.२४) त्याची प्राणज्योत मावळली. दरम्यान, पोलिसांनी फरार आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

शिर्डीत पंधरा दिवसांपूर्वी असाच एक खून झाला होता. त्या दरम्यान ही क्षुल्लक पैशाचे कारण होते. ते प्रकरण ताजे असताना असा प्रकार घडला. त्यामुळे अचानकपणे शिर्डी गुन्हेगारीच्या दहशतीत गेली आहे. निमगाव परिसरातील अकरा नंबर चारीजवळ अमित प्रेमजी सोला (वय-३६ ) ह.मु. श्रीरामनगर, शिर्डी मूळ रा. वसई. जि. ठाणे हा गेल्या पाच वर्षांपासून एका बंगल्यात देखभाली व मजुरांचे काम करत होता. याच ठिकाणी त्याचा इकरम निझाम पठाण हा मित्र झाला होता. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेले लॉकडाउन अमितला आर्थिक अडचण होती. त्यामुळे त्याने रस्त्यात सुरू असलेले पाईपलाईन बसविणेचे मजुरी काम ३५० रु.च्या हजरीने केले होते.

माहिती इकरमला मिळाली. त्याने अमितजवळ पैशासाठी तगादा लावला. मात्र, दोघात यामुळे बाचाबाची झाली. मंदिर परिसरालगत असणाऱ्या पादचारी मार्गावरच इकरमने जवळ असलेला चाकू अमितच्या पोटात ढकलला. त्याचक्षणी तो खाली कोसळला. त्यानंतर अमितला दि.२२ रोजी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इकरम निझाम पठाण (वय-४० ) रा.श्रीरामनगर, शिर्डी हा त्या दिवसापासून फरार आहे. त्याच्याबरोबर त्याचे साथीदार ही फरार झाले आहेत. त्यांच्यावर अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती शिर्डी पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक प्रवीण दातरे करीत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here