Jalna : नवीन जालन्यातील कत्तलखान्यावर धाड; 4 जनावरांची सुटका, एकाला अटक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – नवीन जालन्यातील चमडा बाजार भागातील रफिक रशीद कुरेशी याच्या अवैध कत्तलखान्यावर भल्या सकाळी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. 

पविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, सदर बाजार पोलीस ठाण्याचे संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी सुधीर वाघमारे, बाबा गायकवाड, स्वप्नील साठेवाड, योगेश पठाडे, सोपान क्षीरसागर, देवाशीष वर्मा, चालक बी. डी. कासारे, गणेश जाधव आदी सहभागी झाले होते.

तीन बैल, एक वगारु असे चार जनावरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने बांधून ठेवलेले आढळून आले. पोलीस वेळीच पोहचल्याने या जनावरांचे जीव वाचले. यावेळी कत्तलखान्यात कापलेल्या जनावरांचे 38 शिंगे आढळून आले आहेत. यावेळी पोलिसांनी 1 लाख, 49 हजार रुपये किमतीचे तीन मोठे बैल, एक वगारु, चार सुरे, दोन कुऱ्हाडी, कापलेल्या जनावरांची 38 शिंगे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी रफिक कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here