Shrirampur : पुण्याचा वानवळा निपाणीत; निपाणीवडगाव परीसर केला सील

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर – तालुक्यातील निपाणीवडगाव येथील 40 वर्षीय तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण पुण्याला कामाला असल्या कारणाने पुण्याचा प्रवास नेहमी होत असे. त्यामुळे पुण्याचा वानवळा निपाणीत आल्याची चर्चा सध्या श्रीरामपूर तालुक्यात सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने निपाणीवडगाव परीसर सील केला आहे.

हा तरुण कामानिमित्त सुट्टीच्या दिवशी श्रीरामपूर शहर व परिसरात अनेकांच्या संपर्कात आल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यामुळे या तरुणाने कोणाकोनाला वानवळा दिला. हे आता चौकशी अंतीच समजेल. जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील एक अपवाद वगडळता स्थानिक एकही रुग्ण सापडला नव्हता.

आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झालेली होती. मात्र, आता निपाणीवडगाव येथील एक तरुण हा पुण्याहून परत आला होता. पण तो तरुण पुन्हा पुण्याला जाऊन आल्याने तेथेच त्याला कोरोनाची लागण झाली असावी, आपल्याला कोरोना झाला असावा, असा संशय आल्याने तरुणाने स्वत:हून तपासणी केली असता, अहवाल हा पॉझिटीव्ह आला.
तसेच गावातीलच एका खाजगी डॉक्टरकडे सदर तरुण जाऊन आला होता. म्हणून त्या डॉक्टरांनाही अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. घरातील सर्व सदस्यांना देखील तपासणीसाठी पाठवले आहे. तरुण हा नुकताच पुण्याला जाऊन आला व त्याचे घर सुद्धा गावापासून दूर शेतात असल्यामुळे संपर्क कमीच आहे. असे निपाणीवडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच दौंड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here