Sangamner : आज एका कोरोना बधिताचा मृत्यू तर चार नवीन बाधित रुग्णांची भर

0

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेर –  आज, संगमनेरकरांना दे धक्का संगमनेरमध्ये आज एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू तर आजच नवीन चार कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने नुसती संगमनेरची कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10 तर बाधित रुग्णांची संख्या 97 वर जाऊन पोचले आहे. बाधित रुग्ण संख्या आता शंभराच्या जवळ पास पोहोचल्याने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. सर्व सामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

कोरोना वाढीचे चक्र आज पुन्हा एकदा जोराने फिरले आहे. शहरातील राजवाडा भागात रविवारी आढळलेल्या ३८ वर्षीय बाधित महिलेचा आज मृत्यू झाला आहे. संगमनेरमधील हा कोरोनाचा दहावा बळी ठरला आहे. तर आजच नव्याने चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. करोनाने आज तर शहरातील चक्क ऑरेंज कॉर्नर या उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या परिसरात शिरकाव केला आहे.

आज (बुधवारी) सकाळी जिल्हा व तालुका प्रशासनाला मिळालेल्या अहवालामध्ये चार रुग्ण बाधित आढळून आले. यात एक ४८ वर्षीय व्यक्ती ठाण्यावरुन संगमनेरमध्ये आलेला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील ऑरेंज कॉर्नर परिसरातील उच्चभ्र् वसाहतीत असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला बाधा झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तर यापुर्वी बाधित रुग्ण आढळलेल्या आणि कन्टेन्टमेंट झोनमध्ये असलेल्या कोल्हेवाडी रोडवरील 40 वर्षीय व्यक्तीला बाधा झाली असून यापुर्वी बाधित आढळलेल्या नवघरगल्ली परिसरात देखील पुन्हा नव्याने २६ वर्षीय तरुण बाधित आढळला आहे.

बुधवारी झालेला एका महिलेचा मृत्यू आणि नव्याने आढळलेल्या चार बाधितांमुळे संगमनेरातील करोना आलेख वाढला असून बाधितांची संख्या ९७ वर गेली आहे. तर मृत झालेल्यांनी दोन अंकी संख्येत प्रवेश करत 10 चा आकडा गाठल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here