Shrigonda : आशिया खंडात नावाजलेल्या काष्टी सोसायटीच्या एकहाती भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी – राकेश पाचपुते

प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – ज्यांच्या अधिपत्याखाली आणि सूचनेनुसार गेली २५ ते ३० वर्ष  सोसायटीचा कारभार चालविला जातो आहे ते मार्गदर्शक संचालक म्हणून सह्यांच्या अधिकारासह कारभार पाहत असलेल्या भगवानराव पाचपुते व त्याच्या संचालक मंडळाने २००५ सालापासून काष्टी सोसायटीत केलेल्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात करण्यात आली आहे.

सहकार महर्षी नागवडे कारखान्यांचे विद्यमान संचालक राकेश कैलास पाचपुते व प्रा.सुनिल माने तसेच सोसायटीच्या आजी माजी संचालकासह काही सभासदांनी यासंबंधीचे निवेदन शुक्रवारी (दि. १९) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच सहकार आयुक्त (महाराष्ट्र राज्य), सहकार सहनिबंधक नाशिक, मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर, मा. सहाय्यक श्रीगोंदा यांना दिले आहे, अशी माहिती राकेश पाचपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

काष्टी सोसायटीचे तत्कालीन सचिव जे. एम. पाचपुते यांनी २४ एप्रिल श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भगवानराव पाचपुते व त्यांच्या मुलाच्या नावाने काष्टी सोसायटीत खरेदीच्या कामात होणारा हस्तक्षेप तसेच १९ जुलै ते २५ जुलै २०१८ च्या काळात

विविध कंपन्यांच्या मार्फत संचालक मंडळाला अंधारात ठेवत केलेल्या विदेश दौऱ्या बाबत तसेच संस्थेच्या कारभारात होणाऱ्या हस्तक्षेपा बद्दल लेखी तक्रार केली होती, सोसायटीच्या विविध विभागांसाठी कोट्यवधी रुपयांची सदोष पद्धतीने होणारी खरेदी, संस्थेने ठरून दिलेली वस्तूच्या विक्रीची स्टॉक कंट्रोल प्राईझ पेक्षा जादा दराने विक्री करून विक्रीची किंमत व शिल्लक राहणारा स्टॉक यांच्यात असलेली विसंगती,

४ हजार सभासद संख्या असणारी सोसायटी त सध्या फक्त ६०० च्या आसपास सभासद शिल्लक राहिले असल्याने २०१६ साला पासून काष्टी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची सभासदत्वाची मागणी अर्ज करणाऱ्यांचे अर्ज ना मंजूर करणे व अपात्र असणाऱ्यांना राजकीय स्वार्थासाठी गुपचूप सभासद करून घेणे, संस्थेमार्फत वाटप होणाऱ्या नियमबाह्य कर्जाच्या वाटपाची चौकशी, २९ लाख ५० हजार रुपयांची सहकार खात्याच्या मंजुरी शिवाय केलेली खरेदी, संचालकांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्य सहकारी आयुक्तांच्या मंजुरी शिवाय नवीन संचालकांची नियम बाह्य नेमणूक, तसेच संस्थेच्या विद्यमान सचिवांच्या बेशिस्थिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्यांना पाठीशी घालणे अशा विविध प्रकारच्या भ्रष्ट कारभाराची २००५ सालापासून चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती राकेश कैलास पाचपुते व प्रा.सुनिल माने तसेच सोसायटीच्या आजी माजी संचालकासह काही सभासदांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कैलास पाचपुते, काशिनाथ काळे, दत्तात्रय पाचपुते, प्रकाश पाचपुते, पोपटराव पाचपुते, सर्जेराव पाचपुते उपस्थित होते.
आशिया खंडात नावाजलेल्या काष्टी सोसायटीत भगवानराव पाचपुते याचा भ्रष्ट कारभार म्हणजे बाई वाड्यावर या…. या उक्ती प्रमाणे आल्यावर बघू, तेथे घरी गेल्यानंतर सर्व आर्थिक तडजोड करुन कामे  होत आहे. त्यांचा असा सध्या चाललेल्या कारभाराला सर्वजन कंटाळून  गेले आहे, असे संचालक संर्जेराव (बापू) पाचपुते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here