Shrirampur : तालुक्यात पुन्हा दोघे कोरोना बाधित; बाधितांची संख्या 3 वर

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर : तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील एक व शहरातील गोंधवणी परिसरातील एक महिला, असे दोन जण आज कोरोना बाधित आढळून आले. 

तालुक्यामध्ये यापूर्वी बाहेरील नागरिक बाधित सापडले होते. मात्र, काल निपाणी वडगाव येथील एक जण बाधित सापडले. त्यानंतर आज शहरातील गोंधवणी परिसरातील एक महिला व महांकाळ वडगाव येथील एक असे आज 2 दोन बाधित रुग्ण सापडले असून गोंधवणी येथील बाधितांच्या संपर्कातील आठ व्यक्तींना नगर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, गोंधवणी परिसर सील केला असून पालिकेने परिसरात औषध फवारणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here