Shevgaon : खाजगी पशुवैद्यकिय व्यावसायिक  संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी डॉ. मल्हारी लवांडे

3
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव –  तालुका खाजगी पशुवैद्यकिय व्यावसायिक संघटनेच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी खरडगाव येथील पशुसेवक डॉ. मल्हारी लवांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. शेवगाव येथे संघटनेची बैठक झाली. त्यात अनेक पदाधिकाऱ्याच्या निवडी कारण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल झिरपे तर कार्याध्यक्षपदी डॉ . प्रदिप पाटेकर यांचीही निवड करण्यात आली. 

यावेळी डॉ. बाजीराव अटक, डॉ .दतात्रय धावणे , डॉ .महेन्द्र लाड या विस्तार अधिकाऱ्यासह शिवाजी झिरपे, कृष्णा बोडखे ,  अरूण लांडे, संतोष काशिद, सुभाष घुले , दिगबर पवार, सुनिल भापकर , गणेश धावणे , ज्ञानेश्वर डमाळ , बप्पासाहेब इशारवाडे आदी पशुसेवक उपस्थित होते.

यावेळी डॉ. लवांडे म्हणाले की तालुक्यातील खाजगी पशुसेवकांचे प्रश्न प्राधन्याने सोडविण्यावर भर देण्यात येईल. सर्वांना विश्वासात घेऊन संघटना मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येईल संघटनेच्या हिताचे निर्णय घेण्यावर भर देण्यात तसेच खाजगी पशुवैद्यकांना काम करत असताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून कुठल्याही शासकीय सवलती मिळत नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधीमार्फत शासन दरबारी पाठपुरावा करू.

डॉ. मल्हारी लवांडे शेवगांव तालुका खाजगी लघु पशुवैद्यकिय संघटनेच्या शेवगा़व तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  त्यांचे आ. मोनिका राजळे बापुसाहेब पाटेकर, नितिन काकडे , अरुण मुंढे , डॉ . हरिचंद्र गवळी , डॉ . शेळके , रामनाथ रुईकर , दिपक बोडखे , गोविद ठोबरे, प्रविण गायकवाड, दादासाहेब काकडे , विकृम लबडे , शनेश्वर मित्रमंडळीच्या वतीने तसेच परिसरातील पशुपालकाकडून अभिनंदन होत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here