Shevgaon : उमेश भालसिंग यांनी घेतली पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांची भेट

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – कोभाळने तालुका अकोले या ठिकाणी राहणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे यांची बीजमाता ही ओळख संपूर्ण भारतात आहे. त्यांनी अतिशय दुर्गम भागात सह्याद्रीच्या उंचीचे काम उभे केले. याचीच उत्सुकता म्हणून वाघोली येथील युवा नेते उमेश भालसिंग व भाऊराव भालसिंग यांनी बीजमातेची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. 

यावेळी बिजमाता राहीबाई यांनी आपल्या गावरान बियाणे बँकची अनमोल अशी माहिती दिली, त्यांनी जतन केलेली बियाणी गावात आणून घरोघरी परस बाग करण्याचा मनोदय आहे. तसेच ऐंशी प्रकारचे भाजीपालाचे वाण शाळेमध्ये जोपासणार असल्याचे उमेश भालसिंग यांनी सांगितले. यावेळी यांच्या घरामध्ये सन्मानाने मिळालेले पुरस्कार, स्मृतीचिन्ह असलेले दालन कौतुकाने दाखवले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here