Crime : वांगी बुद्रुक येथील ‘तो’ बेवारस मृतदेह गावातीलच व्यक्तीचा

मयताची बॅग एका महिलेच्या घरी सापडली

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  

तिळापूर वांगी बुद्रुक शिवारात राहणारे सखाराम बारके बेळे गट नंबर 23 मध्ये बंद पडक्या घरांमध्ये एक व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. हा मृतदेह गावातील बेळे नावाच्या व्यक्तीचा असल्याचा पोलिसांनी सांगितले  संबंधित व्यक्तीची बॅग एका महिलेच्या घरी सापडल्याने मयताची ओळख पटली. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, मयत शेषराव गंगाराम बेळे हा 16 जून रोजी भावाकडे गेला होता. त्यानंतर तो त्याच्या दुसऱ्या बायकोकडे गेला होता. त्याचवेळी वांगी येथील बंद पडक्या घरामध्ये एक व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता.
परिसरामध्ये मृतदेहाची ओळख पटते की काय याची कसून चौकशी केली. परंतु मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटली नाही. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करून ग्रामपंचायत स्मशानभूमी हद्दीत दफनविधी करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी खिर्डी येथील एका व्यक्तीच्या संपर्कातील एक व्यक्तीच्या घरामध्ये एक कपडे भरलेली बॅग व शेषराव गंगाराम बेळे या नावाचे लायसन्स इतर महत्वाचे कागदपत्र व मोबाईल इत्यादी मिळून आले असता मृतदेह आपल्याच व्यक्तीचा असावा, असा संशय आल्याने बेळे कुटुंबाची खात्री पटली की हा मृतदेह आपल्याच घरातील व्यक्तीचा आहे.
त्यांनी माहिती दिली आज रोजी मृतदेहाची ज्या घरच्यांना ओळख पटली नव्हती त्याच व्यक्तींनी विधिवत वांगी बुद्रुक प्रवरा तेरी शेषराव बेळे व्यक्तीचा दशक्रिया विधी पार पाडला. परंतु अजूनही गावात चर्चा आहे की ही आत्महत्या की घात पात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here