Ahmednagar BreakingNews : Corona Updates : नगरमधील चौघांना कोरोना; जिल्ह्यात १२ रुग्ण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नगर : जिल्ह्यात आज १२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात नगर शहरातील चार जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ३६ कोरोना संसर्ग रुग्ण झाले आहे. त्यात नगर शहरातील २२ जण आहेत.

आज नगर शहरातील नालेगाव येथील वाघ गल्ली मधील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवक कोरोना बाधित आहे. सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. पारनेर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर आणि नगर तालुक्यातील हे रुग्ण आहेत.

सुपा (पारनेर) येथील ५६ वर्षीय महिला कोरोना झाला आहे. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी झाल्या होत्या दाखल. चंदनपुर (राहाता) येथील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल केले.

संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष आणि नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित आहे. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी केले होते दाखल झाले.

श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाले. श्रीरामपूर  तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला कोरोना बाधित आहे. ठाणे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित आहे. मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.

कळवा (मुंबई) येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित आहे. मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून मुंबई पोलिस दलात कार्यरत. खडकवाडी येथील पोलिसासह ठाण्याहून हे दोघे एकत्र अहमदनगर येथे आले होते.

तोफखाना परिसर आणि सिद्धार्थनगर भागात कोरोना संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण आढळले. महापालिकेने दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. हे दोन्ही भाग महापालिका प्रशासनाने सील केले आहेत. या दोन्ही भागाकडे येणारे रस्ते महापालिका प्रशासनाने पत्रे लावून बंद केले आहेत. तोफखाना आणि सिद्धार्थ नगर भागात महापालिका प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात येणार आहे.

दरम्यान प्रतिबंधित तोफखाना परिसरात चितळे रोडचा भाग येतो. त्यामुळे चितळे रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाने उठविले आहे. त्यामुळे चितळे रोडवर सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.

तोफखाना परिसर :
सिद्धीबाग कोपरा, तोफखाना, शितळा देवी मंदिर, श्री. लयचेट्टी यांचे घर, बागडे ज्वेलर्स, चितळे रोड, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, दत्त मंदिर ते सिद्धीबाग कोपरा

सिद्धार्थनगर परिसर :
सिद्धार्थनगर, सारडा कॉलेजची पाठीमागील बाजू, गोळीबार मैदान, दीपक मोहिते घर, गुरुकुल शिक्षण मंडळाच्या उत्तरेकडील बाजू, जाधव मळा, कवडे नगर, सारडा कॉलेज, असे तोफखाना परिसर आणि सिद्धार्थनगरमधील प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here