Sangamner : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली; आज आणखी तीन रुग्ण

आज शहरातील मोमीनपूरा व नायकवाडपूरा व कुरण येथील बाधित रुग्ण …..

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरकरांवर हल्ला करणार्‍या कोरोनाच्या विषाणूंमुळे तीन जण बाधित असल्याचा अहवाल आज प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोरोना बधित रुग्णाचे चक्र आज फिरुन 100 वर जाऊन थांबलेले आहे.

शहरातील मोमीनपूरा येथील 46 वर्षीय एक व्यक्ती व नायकवाडपूरा भागातील 50 वर्षीय महिलेला तर तालुक्यातील कुरण येथे 85 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. आज सकाळी संगमनेरच्या आकडेवारीत या दोघांची तर सायंकाळी एका जेष्ठ महिलेची भर पडल्याने तालुक्याच्या बाधित संख्येने शंभरी गाठली आहे.

संगमनेर शहरातील मोमीनपूरा व नायकवडपुरा परिसरात आज हे दोघे बाधित रुग्ण सापडले आहे या परिसरात यापूर्वी कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. त्यांच्या संपर्कात हे दोघे आले असतील असे प्रशासनास वाटत आहे. या परिसरातील अधिक ही काही नागरिक या भागात पूर्वी निष्पन्न झाले आहेत त्यारुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत काय याचा ही तपास प्रशासनाने सुरू केला आहे. आज सकाळी या दोन्ही व्यक्तिंचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने मोमीनपूरा व नायकवाडपूरा भागात धाव घेतली असून बाधितांच्या कुटुंबियांना ताब्यात घेवून त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये पाठविण्याची तयारी सुरु केली आली आहे. तर सायंकाळी कुरण गावात प्रशासनाने धाव घेतली असून या जेष्ठ बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्यांची शोध सुरू केला आहे.

दिलासादायक
आज दुपारपर्यंत संगमनेर तालुक्यातील 85 अधिक बाहेरुन येथे आलेले 15 असे एकूण 100 वर कोरोना बधित रुग्णाची संख्या पोहचली आहे. तरी देखील कोरोना मुक्त (बरे झालेले) झालेल्या रुग्णांची संख्या देखील आज पर्यंत 75 वर गेलेली आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे (आज) सध्या 15 रुग्ण कोरोना बाधित आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here