Accident Breaking News : भालगावजवळ मोटारसायकलची समोरासमोर धडक; एक ठार दोन जखमी

4
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
पाथर्डी तालुक्यातील भालगाव जवळ शिरूरकासार तालुक्यातील दोन मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली. यात वडाचीवाडी (तिंतरवणी) येथील एक जण जागीच ठार झाला असून दुसरे शिरूरकासार शहरातील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नगरला हलवण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. 

शिवा खेडकर, असे मयताचे नाव असून विशाल थोरात व कातखडे हे जखमी झाले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, वडाचीवाडी(तिंतरवणी) येथील शिवा खेडकर हे आपले काम आटोपून गावाकडे मोटारसायकलने चालले होते. ते भालगावच्या चौफुल्याहून भालगावाजवळ जाताच समोरून येत असलेल्या शिरूरकासार शहरातील विशाल थोरात, कातखडे यांच्या मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक झाल्याने त्यातील शिवा खेडकर हे जागीच ठार झाले. तर दुसरे शिरूरकासार येथील विशाल थोरात, कातखडे सुरेश हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नगरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यात घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here