Newasa : गावठी कट्ट्यासह तरुणास अटक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई पोलिस ठाण्याअतंर्गत घोडेगाव येथे बेकायदा गावठी कट्टा विक्रीसाठी आणला असता सोनई पोलिसांनी निलेश उर्फ निलकंठ मधूकर केदार रा.घोडेगाव यास अटक केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनई पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार घोडेगाव येथ ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी सदर आरोपी विनापरवाना गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची
पक्की खबर मिळाली. सोनई पोलिस ठाण्याचे स.पो.नि जनार्दन सोनवणे स.पो.नि थोरात यांच्यासह खाजगी वाहनाने घटनास्थळी गेले असता आरोपी पळून जाऊ लागला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून केदार यास जेरबंद करुन सोनई पोलीस ठाण्यात आणले व चौकशी करता आरोपीने उडवाउडवीची उत्तरं दिली मागील आठवड्यात सोनई जवळ खेडले परमानद येथे देखील नगर गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक केली. यामुळे मोठे रॅकेट ऊघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर आरोपीवर गु.र.न२११/२०२० भा.द.वीहत्यार कायदा ३.७/२५ ३७, (१)(३)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती दिपाली काळे  उपविभागीय पोलीस अधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि सोनवणे स.पो.नी ज्ञानेश्वर थोरात बाबा वाघमोडे गावडे चव्हाण कदम आदी पोलिसांनी यशस्वीपणे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here