Beed : नगर पालिका सर्व साधारण सभेत विविध कामांना मंजुरी – नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर

3
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – नगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत विविध कामांना मंजुरी देण्यात आल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे आयोजित केलेल्या सर्व साधारण सभेच्या वेळी सांगितले.


यावेळी
1) वैशिष्ठ्य पूर्ण योजने अंतर्गत पंढरी, धानोरा रोड येथे उद्यान विकसित करणे.
2) ठोक तरतूद अंतर्गत योजने अंतर्गत बीड नगर परिषद यास बस स्टँड मागील बाजू ते नगर नाका, पाणी टाकी रस्ता डांबरीकरण ऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण पद्धतीने सुधारणा करणे बाबत.
3) विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत केनॉल रोड लगतच्या रस्तेस मान्यता देणे बाबत.
4) बीड शहरातील अनेक ठिकाणी असलेले कच्चे रस्त्यांवर व इतर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी खडी, मुरूम पुरवठा करणे व पसरविण्याच्या कामासाठी मागविण्यात आलेल्या ई-निविदेस मान्यता.
5) बीड शहरांत पोलीस विभाग बीड यांनी उभारलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणेच्या कामास ई निविदा प्रसिद्ध करणेकरीता मंजुरी देणे व निविदा प्रक्रिया अंती कमी दर देणाऱ्या निविदा धारकास कार्य आदेश प्रदान करणे बाबत.
6) अल्पसंख्याक योजने अंतर्गत अल्पसंख्याक भागातील विविध विकास कामासाठी अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे बाबत.

7) युडी 6 या योजने अंतर्गत मोंढा रोड सिमेंट काँक्रीटीकरण करणेस्तव अर्थसहाय्य प्रस्ताव शासनाकडे सादर करणे बाबत.

याविषयांवर सभेत चर्चा झाली व वरील कामांना मंजुरी देण्यात आली.
नगर परिषद व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या तोंडाला मास्क लावणे, डिस्टंसिंग पाळणे आदी सूचनांचे शहरातील नागरिकांनी पालन केल्यामुळे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शहरातील नागरिकांचा अभिनंदनाचा ठराव मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी चीनच्या लढ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. तसेच नगरसेवक खदीर ज्वारीवाले यांना देखील सभेत श्रद्धांजली वाहन्यात आली.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here