Ahmednagar : किर्तनकार इंदोरीमहाराज यांच्याविरोधात संगमनेर न्यायालयात तक्रार दाखल

पीसीपीएनडीटी कायद्याच्या भंग केल्याचा आरोप

पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या विधानामुळे अडचणीत

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगर : किर्तनकार इंदोरीमहाराज यांच्याविरोधात संगमनेर न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) भंग केल्याच्या आरोपाखाली ही तक्रार दाखल झाली आहे.

इंदुरीकर महाराजांनी पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या विधानांमुळे अडचणीत आले आहेत. पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचे विधान त्यांनी किर्तनातून सांगितले होते. इंदुरीकर यांच्या या विधानावर सामाजिक संघटनांनी टीकेची झोड उठवली होती. महिला सामाजिक कार्यकर्त्या यात अग्रभागी होत्या.

इंदोरीकर यांनी यावर आपल्या विधानाबाबत केलेला खुलासा जिल्हास्तरीय समितीने यापूर्वीच फेटाळला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता संगमनेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही केला होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here