Shrigonda : तंटामुक्ती अभियानातून १०५ झाडांची लागवड…

शेडगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा उपक्रम

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील शेडगाव येथे ग्रामपंचायतमध्ये सरपंच व सदस्यांमार्फत गावात तंटामुक्ती अभियानाअंतर्गत जमा झालेल्या ९ हजार ९०० रुपये रकमेतून गावठाणात रोडच्या कडेला १०५  झाडांची लागवड करण्याचे काम सुरु केल्याचे सरपंच विजय शेंडे यांनी सांगितले. 

याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे तंटामुक्तीचे अध्यक्ष भीमराव बेलेकर यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे आपापसातील वाद मिटवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गावात तंटामुक्ती अभियान चालवून गावातील वाद गावातच मिटून ग्रामस्थांचे वाद समजून घेऊन ग्रामपंचायतमध्ये दोन्हीही वादी-प्रतीवादी यांना बोलावून वाद मिटवण्यात येत आहेत.

यासाठी प्रत्येक ग्रामस्थांसाठी वेळ देऊन ग्रामस्थांच्या रानात जाऊन स्वतः टेप धरून मोजणी करुन वाद मिटविण्यात येत आहेत. असंख्य प्रश्न, वाद विवाद घेऊन ग्रामस्थ तंटामुक्तीकडे येत असतात. यासाठी अर्ज फी म्हणून प्रत्येकी १०० रु घेऊन त्याची रीतसर पावती देण्यात येते. आज पर्यंत ९९ अर्ज येऊन त्यातील काही तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. तर काही अर्जाचे निरसन करने बाकी आहे. यामधुन आपल्याकडे ९ हजार ९०० रु जमा झाले आहेत.
जमा रकमेतून गावातील गावठानात रोडच्या कडेला १०५ वृक्ष लागवड करण्याचे काम चालू केले असल्याचे सरपंच विजय शेंडे यांनी सांगितले. यासाठी बाळासाहेब (आण्णासाहेब) कुदळे, राजाराम रसाळ, शांताराम गोरे, धनराज भोपळे , विष्णूपंत भोपळे , राजेंद्र(झुंबर) भोसले, अरुणराव भदे , कारभारी बेलेकर यांचे मोठे योगदान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here