Shirurkasar : शरद पवार विरोधातील ‘ते’ वक्तव्य : आमदार पडळकर यांच्याविरोधात बारामती नंतर शिरूरकासारला गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शिरूरकासार – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमचे नेते शरद पवार यांच्या विरोधात पातळीहिन वक्तव्य केल्या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी गुरुवारी रात्री फिर्याद दिली. त्यानुसार उशिरा शिरूरकासार पोलिस स्टेशनला आमदार पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. राज्यातील बारामतीनंतर शिरूरकासारला दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे.

शरद पवार हे देशाच्या राजकारण समाज कारणातील मोठा दबदबा असलेले नेतृत्व असून अनेक वेळा राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण, कृषीमंत्री अनेक वर्षे पद भुषवुन काम केले आहे राष्ट्रवादी पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. गोपीचंद पडळकर या भाजपचे विधानपरिषदेचे आमदार असलेल्या या व्यक्तीने आमच्या नेत्याची व पक्षाची बदनामी होईल, असे वक्तव्य केल्याने मोठी हानी केल्या प्रकरणी शिरूरकासार पोलीस ठाण्यात काल गुरुवारी रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब यांच्या फिर्यादीवरून आमदार पडळकर यांच्या विरोधात उशिरा गुन्हा दाखल झाला. बारामती नंतर शिरूरकासारला हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here