AhmednagarBreaking : Corona Updates : जिल्ह्यात आज 28 जण कोरोना पॉझिटिव्ह

1
नगर शहरात 25 रुग्ण तर तीन जण राहता, जामखेड आणि कर्जत येथील

नगर : अहमदनगर जिल्ह्यात आज २८ जणांना कोरोना संसर्ग झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. अहमदनगर शहरातील यात २५ जणांचा समावेश आहे. सिद्धार्थनगर, तोफखाना आणि नालेगावमधील हे रुग्ण आहेत. उर्वरित ०३ जण अहमदनगर ग्रामीण भागातील असून हे राहता, जामखेड आणि कर्जत येथील आहेत.

नगर शहरात सिद्धार्थनगर भागात ०६, वाघगल्ली नालेगाव भागात ०४,  तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत. जिल्ह्यात कोरोनावर उपचार घेणारे १०५ जण झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ०३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत २६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर सध्या ॲक्टिव रुग्णसंख्या १०५ इतकी झाली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here