Shrigonda : प्राथमिक शाळेचा भोंगळ कारभार, नियोजनाआगोदर शौचालाय पाडले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील टाकळीकडे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शौचालाय शाळेने पाडल्याने शाळा सुरु झाल्यावर मुलाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापक यांनी याबाबत योग्य ती कारवाई करत मुलांची गैरसोय थांबवावी. नाहीतर याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे दाद मागणार, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते वसंत वाळुंज यांनी दिली आहे.

भारत सरकार घरोघरी शौचालय बांधावे यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करते. त्यातून हजारो शौचालयाची निर्मिती केली जाते. मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शौचालय मुख्याध्यापक यांनी पाडल्याने शाळा सुरु झाल्यावर मुलाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.

याबाबत मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे याना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की याबाबत ग्रामपंचायत टाकळी कडे यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांशी चर्चा करून ग्रामपंचायत यांनी मदतीचे आश्वासन दिल्यावर शाळेतील शौचालाय पाडले आहे. शाळा सुरु झाल्यावर नाही. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोय नाही झाल्यास मुलासाठी पर्यायी सोय उपलब्ध केली जाईल, असेही मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र ग्रामपंचायत कार्यालयाने मदत न केल्यास मुलाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्यामुळे मुलाची गैरसोय थांबवावी अन्यथा याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे दाद मागणार, असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते वसंत वाळुंज यांनी दिली आहे.

आम्ही कोणताही शब्द दिलेला नाही – सरपंच 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शौचालाय कोणाच्या सांगण्यावरून पाडले आणि का पाडले याबाबत ग्रामपंचायतने शाळेला कोणताही शब्द दिलेला नाही. तसेच यासाठी १४ व्या वित्त आयोगामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी शिल्लक नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारे शाळेला सहकार्य करू शकत नाही, असेही सरपंच रणसिंग यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here