Karjat : अळसुंदे येथील १८ वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या @ ११

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : अळसुंदे येथील ६५ वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळल्यानंतर तिच्या संपर्कातील १४ व्यक्तींना अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी १२ व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला असून एका १८ वर्षीय तरुणीचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. अजून एक अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली. कर्जत तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णाची एकूण संख्या ११ झाली आहे.

बुधवार दि २४ रोजी अळसुंदे ता कर्जत येथील ६५ वर्षीय महिलेचा खाजगी प्रयोगशाळेतला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला होता. सदर महिला अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. बुधवारी तिच्या संपर्कातील असणाऱ्या १४ व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी अहमदनगरला पाठविण्यात आले होते. सदर महिलेच्या संपर्कातील १२ व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला. तर शुक्रवारी एका १८ वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

अजून एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित असून कर्जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या ११ झाली आहे. मागील दोन महिन्यात लॉकडाऊन काळात कर्जतकरांनी कोरोना प्रवेशाला चांगलाच लगाम घातला होता. मात्र २२ मे रोजी कर्जत तालुक्यात कोरोनांने प्रवेश करत प्रशासनास सतर्क केले. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे नियम पालन करीत कायमस्वरूपी बाहेर पडताना तोंडास मास्क, हातास सॅनिटायजर लावणे बंधनकारक करावे असे आवाहन तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तालुक्यात अथवा ग्रामीण भागात बाहेरील व्यक्तीचा प्रवेश होत असल्यास त्याची माहिती प्रशासनास द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here