Shrirampur : खतं विकत घेण्यासाठी शेतक-यांची रांग; सामाजिक अंतराचा फज्जा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – देवळाली प्रवरा सहकारी सेवा संस्थेच्या खत विक्रीच्या ठिकाणी सामाजिक अंतर न ठेवता खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना  रांगेत उभे करुन सामाजिक अंतराचा शेतकऱ्यांनी फज्जा उडविला आहे.

देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या कार्यालयात खत डेपो आहे.या खत डेपोवर खते घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. खत विक्रीचे बिले व खत एकाच ठिकाणी  आहे.खताची बिले करण्यासाठी शेतकरी रांगेत उभे राहत आहेत.परंतू उभे राहत असताना शेतकरी कोणतेही सामाजिक अंतर ठेवत नसल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडला आहे.याबाबत सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहुण न पाहिल्या सारखे करत मासिक बैठकीकडे निघून गेले.

कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन पुकारण्यात आल्यावर धान्य दुकानावर होणारी गर्दी लक्षात घेवून संस्थेने शांताबाई  सांस्कृतिक भवनात  सामाजिक अंतर  पाळता येईल अशा अंतरावर आसन व्यवस्था करुन रेशन वरील धान्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला सामाजिक अंतरावर बसवून रेशन धान्य खरेदीचे बिले केली जात होती. याबाबत राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी व्यवस्थापनाचे कौतुक केले होते.

त्याच संस्थेत माञ शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे. रेशन खरेदीसाठी ज्या प्रमाणे  सोय केली होती. त्याप्रमाणे खते खरेदीसाठी संस्थेने व्यवस्था करावी अशी शेतकरी वर्गातून केली आहे.खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. सेवा संस्थेच्या व्यवस्थापनाने दखल घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here