Kada : दुचाकीची पादचा-याला धडक, दोघेजण गंभीर जखमी

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

इव्हिनिंग वाॅकवरुन घराकडे परतणा-या दाम्पत्यांना मागून भरधाव आलेल्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात पादचा-यासह दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कडा- धामणगाव रस्त्यावर घडली.

कडा येथील अमर शमशुद्दीन शेख हे शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास कडा- धामणगाव रस्त्यावर नेहमीप्रमाणे पत्नीसह इव्हिनिंग वाॅकसाठी गेले होते. त्यानंतर घराकडे परतत असताना संतनगर परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या (एमएच -१९-ए.सी.२१०६) क्रमांक असलेल्या दुचाकीने पायी चाललेल्या दाम्पत्याला जोराची धडक दिली.
या अपघातात अमर शेख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर अज्ञात  दुचाकीचालक देखील गंभीर जखमी झाल्याचे सुत्रांकडून समजते. उपचारार्थ जखमीना पोलिसांकडून दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here