Kada : आरोग्य कर्मचा-यांची पगाराअभावी उपासमार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाच्या भयावह परिस्थितीत ज्या आरोग्य कर्मचा-यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले. त्याच कर्मचा-यांचे दोन महिन्यांपासून पगार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

आष्टी तालुक्यातील कडा, धामणगाव, टाकळसिंग, सुलेमान देवळा, खुंटेफळ या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी (एनपीडब्ल्यु) व सुपरवायझर यांचे मागील दोन महिन्यांपासून पगार थकलेले आहेत. ज्या आरोग्य  कर्मचा-यांनी कोरोना सारख्या महामारीच्या संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस इमानेइतबारे कर्तव्य बजावले, सध्या त्यांच्यावरच पगार नसल्यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. आरोग्य प्रशासनाकडून आरोग्य कर्मचा-यांची पगाराअभावी मोठ्या प्रमाणात हेळसांड होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने तातडीने पगार करावेत.

तसेच मुख्यकार्यकारी अधिका-यांनी आरोग्य कर्मचा-यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी कर्मचा-यांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here