
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नगर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील आडते बाजारातील व्यापाऱ्यांनी स्वत:हून तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार (दि.28) ते मंगळवार (दि.30) असे तीन दिवस मार्केटयार्ड, आडतेबाजार, डाळमंडई, तापकीरगल्ली, दाणेडबरा व परिसरातील व्यापार पेठ बंद ठेवली जाणार आहे.
अहमदनगर आडते बाजार मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, शांतीलाल गांधी, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा आदींनी पत्रकाद्वारे दिली आहे.

आडतेबाजार ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत जिल्ह्यातून लोक येत असतात, आडतेबाजाराच्या आजुबाजूच्या परिसरातील भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा स्वत:हून निर्णय घेतला आहे.