Shrigonda : शहरापासून काही अंतरावर दोन घरफोड्या; 90 हजारांचा मुद्देमाल लंपास

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहरापासून काही अंतरावर असलेल्या भोळे वस्तीवर दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तब्बल 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी फिर्यादी दिलीप सिताराम पिंपळे वय ३९ वर्षे धंदा शेती यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या भोळे वस्तीवर दिलीप हे आपल्या कुटुंबासह राहतात. शेती करून उपजीविका भागवतात त्याचे शेजारीच त्याची आई कांताबाई वेगळी राहते. काल शुक्रवारी रात्री ११/३० वा.चे सुमारास जेवण करुन त्यांची पत्नी ही घराला कडी लावून झोपली होती. फिर्यादी घराबाहेर ओट्यावर झोपले असता आज शनिवारी दीड वाजता दोन अज्ञात चोरट्यांनी घराची बाहेरुन लावलेली कडी काढून आत प्रवेश करुन तिने घरात ठेवलले दागिने व पत्नी आशाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने ओढून चोरुन नेल्याने आशाबाई यांनी आरडाओरडा केला. यावेळी चोरटे घरात शिरल्याचे समजले.
तसेच शेजारी राहणारे नानाबाई संपत लबडे यांच्या घराचाय दरवाजाची कडी हाताने काढून घरातील पेटीतील दागिने चोरुन नेले आहेत.
त्याचे वर्णन खालिल प्रमाणे १ ) ४०,००० / -रु.किंचे सो.आशाबाई दिलिप पिंपळे हीचे गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याची पोत व मणी मंगळसुत्र जु.वा , किं , अंदाजे २ ) २०,००० / – रु.किंचे कांताबाई सिताराम पिंपळे यांचे घरातील रोख १०,००० रुपये सोन्याचे मणी , नाकातील नथ जु.वा , किं , अंदाजे ३ ) ३०,००० / -रु नानीबाई संपत लबडे यांचे घरातील रोख २०,००० / – रुपये , व सोन्यचे पोथीतील मणी जु.वा , किं , अंदाजे ९ ०,००० / – एकुण वरील वर्णनाचा व किंमतीचा माल अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करुन चोरुन नेला आहे .
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच काही वेळानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, दव पडले असल्यामुळे श्वान काही मार्ग दाखवू शकला नाही. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सकाळी पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांनीही भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here