Ahmednagar Corona Updates : नगरमध्ये सहा जणांना कोरोना; जिल्ह्यात १५ रुग्ण

नगर : जिल्ह्यात आज पुन्हा १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले आहे. यात नगर शहरातील ०६ जणांचा समावेश आहे. नालेगाव येथे तीन, आडतेबाजार, तारकपूर आणि नगर शहरातीलमध्यवर्ती भागातील प्रत्येकी एक जणाचा यात समावेश आहे. तर कोहिनूर कापड दुकानातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय श्रीगोंदा येथे तीन, राहता येथे दोन, कोपरगाव, पारनेर, श्रीरामपूर आणि संगमनेर येथे प्रत्येकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ३९७ इतकी झाली आहे, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नालेगावातील ७० वर्षीय वृद्ध, २४ वर्षीय युवक, २१ वर्षीय युवती, आडते बाजारातील ३७ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती भागात ६१ वर्षीय महिला आणि तारकपूर येथे ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. श्रीगोंदे येथील ३८ आणि ३०वर्षीय दोन पुरुष आणि एका ५८ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राहाता येथील २१ वर्षीय युवती आणि ५१ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.

संगमनेर येथे ३८ वर्षीय तरुण, पारनेर येथे २८ वर्षीय युवती, श्रीरामपूर येथे ३० वर्षीय युवक आणि कोपरगाव येथे ४५ वर्षीय पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ही १११ झाली आहे.

दरम्यान जिल्ह्यात आज ८ कोरोनग्रस्त आजारातून बरे होऊन घरी परतले. यामध्ये, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २७३ झाली आहे.

लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावातील वीस जणांच्या घशाचे श्राव घेऊन त्याची कोरोना चाचणी केली होती, त्यातील येळपणे येथील तीन जण पॉझिटिव्ह आल्याने श्रीगोंदेकर यांची धास्ती पुन्हा वाढले आहे. दोन पुरुष व एका महिलेचा त्यात समावेश आहे. भिवंडी येथून ते लोक कोरोना घेऊन गावात आले आहेत. इतर सतरा जण निगेटिव आहेत.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर पत्रकारांना अधिक माहिती देताना म्हणाले की, सुरेगाव येथील अहवाल निगेटिव्ह आला आहे. येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते, परंतु ते आटोक्यात आले असून, श्रीगोंदा शहर, अजनुज येथील अहवाल निगेटिव्ह आहे मात्र येळपणे येथील तिघांमुळे अडचणी वाढल्या आहेत.

नगरची बाजारपेठ रविवारपासून तीन दिवस बंद राहणार आडतेबाजार मर्चंटस्‌ असोसिएशनचा स्वयंस्फूर्तीने निर्णय

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नगर शहर ही जिल्ह्याची बाजारपेठ असल्याने शहरात कायम मोठी वर्दळ असते. मात्र कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेवून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नगरमधील बाजारपेठ रविवार दि.28 जून ते दि.30 जून या कालावधीत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दि अहमदनगर आडतेबाजार मर्चंटस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा व सेके्रटरी संतोष बोरा यांनी दिली.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात प्रशासनाने नगरमध्ये व्यापार्‍यांना नेहमीच सहकार्य केले आहे. शहरात व जिल्ह्यातही रूग्णसंख्या वाढत असल्याने सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे. त्यादृष्टीने रविवारपासून सलग तीन दिवस 30 जूनपर्यंत मार्केटयार्ड, आडतेबाजार, दाळमंडई, तापकिरगल्ली, दाणेडबरा व परिसरातील व्यापारी पेठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे असोसिएशनने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळवले आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत करोना रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख ८ हजार ९५३ इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ५५२ करोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३८४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित बळींची संख्या १५ हजार ६८५ इतकी झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून १४ ते १५ हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं १८ हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

समाधानकारक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. एक लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दोन लाख ९५ हजार ८८१ जणांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारून ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत मोदी सरकारकडे करोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे हात टेकले आहेत. शनिवारी देशातील करोना रुग्णांची संख्या पाच लाखांच्याही पुढे गेली.

करोना व्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. करोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे.

नगर : संगमनेर शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून करोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयास इंडियन कउंसील ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व एम्सने करोना तपासणी लॅबला परवानगी दिली आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याने शंबरी गाठली असून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयास करोना तपासणी लॅब सुरु झाल्यास वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. ट्रनॅट मशीन व आरटीपीसीआर तंत्रज्ञानाद्वारे संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट दोन तासात उपलब्ध होणार आहे. दोन तासाला चार कोरोना टेस्ट केल्या जाणार असून सोमवार (२९ जुन) पासून लॅब सुरु होणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले. लॅबमध्ये आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या स्वॅबची मोफत तपासणी केली जाणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here