Sangamner : विद्युत वाहक तारेला चिकटल्याने भाच्याचा मृत्यू तर मामा गंभीर 

0

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

शेतात काही दिवसांपूर्वी तुटून पडलेल्या वीज वाहक तारेवर पाय पडल्याने लहान भाच्याचा मृत्यू झाला. तर मामा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी तालुक्यातील या घटनेमुळे तालुक्यातील निमगाव पागा येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केले आहे.

या दुर्दैवी घटनेत आर्यन गणेश गायकवाड वय 8 याचा मृत्यू झाला तर मामा प्रवीण मुरलीधर कानवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील प्रवीण मुरलीधर कानवडे हे आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी आलेल्या असताना त्यांच्यापाठोपाठ त्यांचा आठ वर्षाचा भाचा आर्यन गणेश गायकर हा देखील शेतात आला होता. शेतात पडलेली विद्युत वाहक तार व आर्यनच्या लक्षात न आल्यामुळे त्याचा पाय विद्युत्प्रवाह सुरू असलेल्या तारेवर पडल्याने तो तारेला चिटकून बेशुद्ध पडला ही बाब मामा  प्रवीण कानवडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मोठ्याने आरडाओरडा करून त्याला वाचवण्यासाठी गेला. परंतु तो देखील विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला  चिटकला आरडाओरडा झाल्याने वडील मुरलीधर कानवडे यांनी पळत येऊन लाकडाच्या सहाय्याने या दोघांनाही सोडवले.

यादरम्यान आठ वर्षाचा आर्यन हा बेशुद्ध झाला व त्यानंतर प्रवीण देखील बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने संगमनेरला  कॉटेज हॉस्पिटल येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान आर्यनला मृत घोषित करण्यात आले.व मामा प्रवीण कानवडे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात गुन्ह्याची नोंद झाली असून ,अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळा मुळे पडलेल्या महावितरण’च्या विद्युत वाहक तारा शेतात तशाच पडलेल्या होत्या.

त्यामध्ये विद्युत प्रवाह गेली पंधरा दिवसापासून तसाच चालू होता अनेक वेळा कानवडे यांनी महावितरणच्या लाईनमन व धांदरफळ येथे कार्यरत असलेल्या सब इंजिनिअर यांना माहिती दिली होती .परंतु दोन आठवडे उलटून गेले तरीही महावितरणचे लाईनमन व महावितरणचे अधिकारी घटनास्थळी आले. परंतु शेतात पडलेले पोल व तुटलेल्या विद्युत वाहक तारी शेतकऱ्यांच्या शेतातील तारी दुरुस्त न करता तीन आठवडे उलटून गेले तरीही तशाच ठेवल्या व तूटलेल्या विद्युत तारेचा  विद्युत  प्रवाह बंद केला नाही. यामुळे महावितरणाचा भोंगळ कारभार समोर आला असून दोषी अधिकारी याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या संबंधित दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा धांदरफळ खु, येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील असे येथील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here