Shrirampur : बिबट्यानंतर वाघही आता शेतात; उक्कलगाव परिसरात ग्रामस्थांनी पाहिला ‘वाघ ‘ 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

दोन्ही कुत्रे गायब?

तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. उक्कलगाव येथील जगधने वस्ती,महाडिक वस्ती,मोरे वस्ती,आणि धनवाट परिसरातील,थोरात वस्त्यांवर बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. जगधने वस्तीवर रात्रीत नऊ वाजता सुमारास शेतात नांगरणीचे काम सुरू होते. नांगरणी करित असताना संजय जगधने व ट्रॅक्टर चालक दरदंले यांना ट्रॅक्टरच्या समोरून लांब पट्ट्याचा वाघ जाताना दिसला.

अचानकच वाघ दिसल्याने ते घाबरून गेले. त्यांनी लगेच नागरणी बंद करून शेजारील लोकांना त्यांची कल्पना दिली. येथील ग्रामस्थांचा जमाव जमत बॅटरी, फोकसच्या साहाय्याने वाघाला पिटाळून लावले.

त्यानंतरही तो वाघ शेतातच काहीवेळ उभा राहिला होता नंतर शेजारील उसाच्या शेतात निघून गेला. काल परवा मोरे वस्ती येथील दोन कुत्रेही अचानकपणे गायब झाली, असल्याचे संजय जगधने यांनी राष्ट्र सह्याद्रीशी बोलतांना सांगितले. वनविभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीनं पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here