मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह : 30 जूननंतर लॉकडाऊन कायम (पाहा लाईव्ह व्हिडिओ)

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सध्या लॉकडाऊन 30 जूनपर्यंत आहे. यापुढे लॉकडाऊन उठणार नाही. मात्र, परिस्थिती आहे तशीही राहणार नाही. आपण कात्रीत सापडलो आहोत. संकटाचा धोका कायम आहे म्हणून टप्प्याटप्प्याने काम सुरु आहे. राज्यात काही प्रमाणात दुकानं सुरु आहेत, सलून देखील सुरु झाले आहेत. मात्र, संकट टळलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही.

कोरोना आणि लॉकडाऊन संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील चक्रीवादळावेळी जवान व अन्य यंत्रणेने बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले. तर शेतकरी व डॉक्टरांना अभिवादन केले.

घाबरू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले आहे. सोबतच यावेळी त्यांनी येणा-या गणेशोत्सवावर आणि आषाढी एकादशीवरही महत्वपूर्ण भाष्य केले. 

मी पंढरपूरला मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठलाकडे आषाढी एकादशीला साकडे घालणार आहे. तर लगेचच गणेशोत्सव येत आहे. मात्र श्रीगणेश हे विघ्नहर्ता आहे. तेव्हा त्याला कोरोनाचे हे विघ्न हरण्यासाठीही प्रार्थना करायची आहे. मात्र, गर्दीटाळून गणेशोत्सव साजरा करायचा आहे.

मूर्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ

आपल्याकडे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आनंद देणारा उत्सव मात्र गणेश मूर्ती चार फूटापेक्षा उंच नसावी. मूर्ती उचलताना अनेक जण लागतात. मग, एकत्र आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करायचा पण घराघरातूनच… याविषयी गणेश मंडळांसाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून मंडळांनी सरकारच्या निर्णयापाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.

अर्थचक्र मजबूत करणार, गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे खुले.
गुंतवणूकदारांची कोठेही अडवणूक होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी याआधी केंद्रीय आरोग्य पथकासोबत बैठक घेऊन राज्यातील कोरोना नियंत्रणाचाही आढावा घेतला. तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here