Akole Breaking : कोरोना आता अकोले शहरालगत

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अकोले शहरालगत कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, देवठाण रोडला राहणारा एक वाहन चालक असलेला व्यक्तीचा आज कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

एका खाजगी दुकानदाराकडे गाडीने नाशिक, उल्हासनगर, आदि भागात जाऊन दुकानाचे सामान घेऊन येत असलेला गाडी चालक ञास जाणवू लागल्याने अकोले शहरातील एका खाजगी डॅाक्टराकडे उपचार घेत होता. डॅाक्टरांना शंका आली असता त्याला कोरोना तपासणीसाठी अहमदनगरला नेले असता त्याचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

आता त्याच्या संपर्कातील कुटुंबीयासह, शहारातील डॅाक्टर, व दुकान मालक यांना कोरंटाईन करण्यात येईल व लक्षणे दिसल्यास स्वॅब तपासणीस नेले जाण्याची शक्यता आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here