SagamnerBreakingNews : हिवरगाव पावसा येथे झेनॉन गाडी निळवंडे कॅनॉलच्या खड्ड्यात पडून तीन ठार, एक जखमी

बेकायदेशीर वाळू उपसा करून जात होता…

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरात एक टाटा कंपनीच्या झेनॉन ही वाळुने भरलेली गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या निळवंडे कॅनॉलच्या एका 25 फुट खड्ड्यात पडून त्यात तीन जणांनाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. मयतात या वाहन चालकाचा समावेश आहे.

या अपघातात वाहन चालक परवेज भैय्यसाहेब सय्यद (वय 30, रा. संगमनेर खुर्द), विठ्ठल मुरलीधर बर्डे (वय 30, रा. कोंची, ता. संगमनेर), सुरेश संतोष माळी (वय 45, रा. मांची, ता. संगमनेर) हे मयत झाले आहेत. तर अक्षय भाऊसाहेब माळी  वय 20 रा.कोंची ता.संगमनेर हा गंभीर जखमी झाला आहे

या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वाहन चालक परवेश सय्यद व कॅनल चा ठेका घेतलेल्या कंपनीचे या साइटचे इंजिनियर दादासाहेब अशोक नवले रा.भेंडा ता.नेवासा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आज पहाटे हे संगमनेर तालुक्यातील नर्सरी वाटीचा डोह येथे एक टाटाची झेनॉन गाडी नं. एम.एच 14 ए. एच.10 73 घेऊन वाळू आणण्यासाठी गेले होते.आज पहाटेच्या सुमारास गाडीभर वाळू काढून ते परतीच्या मार्गावर असताना निमगाव टेंभी ते हिवरगाव पावसा शिवारात त्यांना रस्त्याच्या बाजूला असणार्‍या निळवंडे कॅनॉलच्या खड्ड्या जवळून हे वाहन भरधाव वेगात नेत असताना हे वाहन या कॅनॉलच्या खोल खड्ड्यात पडले. त्यात या तिघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

आज सकाळी रस्त्याने ये-जा करणार्‍या एका व्यक्तीचे लक्ष या कॅनॉलच्या खड्ड्यात गेले असता त्याला एका वाहन या कनोलच्या खोल खड्यात उपलटी झाल्याचे दिसले तर दोन व्यक्ती गाडीच्या अजू बाजुला पडलेले दिसले. अपघात झाला तेव्हा गाडी चालुच होती. काही काळाने ती बंद पडली असावी , तरी देखील तिची लाईट  मात्र चालुच असल्यामुळे या खड्यात प्रकाश जाणवल्याने हा प्रकार लक्षात आला ही खबर  पोलिसांना समजताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी नागरिकांच्या मदतीने या तिघांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा अगोदरच हे तिघे मयत झाले होते.

जखमी अक्षय माळी याने दिलेल्या तक्रारीत टाटा झेनॉन २०७ गाडी नंबर एम एच १४ ए एच १०७३ वरील चालक मयत परवेज भैयासाहेब सययद याने त्याचे ताब्यातील गाडी मध्ये अवैधरित्या वाळु संगमनेर शहरातील  प्रवरा नदी पात्रातुन भरुन बरोबर वाळुभरणारे यातील  सुरेश संतोष माळी, विठठल मुरलीधर बर्डे, अक्षय भाउसाहेब माळी यांना घेवुन त्याचे ताब्यातील गाडी भरधाव वेगाने पळवून अतिशय निष्काळजीपणे निमगाव ठेंभी ते हिवरगाव पावसा या  शिवहददीवर चालुन येथे चालू असलेल्या निळवंडे कॅनॉलच्या कामासाठी केलेल्या‍ खडयामधे गाडी पलटी केली या रोड वर चालू असलेल्या निळवंडे कॅनॉलचे कामाचा  संदर्भात या ठिकाणी कामावर असलेले साईट इंजीनियर व ठेकेदार यांनी  बॅरीकेटींग न करता कुठलाही कामाचा फलक न लावता दिशादर्शक बोर्ड न लावता हलगर्जीपणा केलेला आहे. त्यामुळे गाडी चालक व काम करणाऱ्या कंपनी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवीला आहे पुढिल तपास सहाय्यक फौजदार शेख आय हे करीत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here