Karjat : सकल मुस्लिम समाज कर्जत यांच्यावतीने रक्तदान शिबीर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
कर्जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या काळात रक्तदान शिबिर घेऊन समाजाचा प्रत्येक घटक प्रयत्न करीत असताना मुस्लिम समाजानेही यात पुढाकार घेऊन एक चांगला उपक्रम राबविला आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी केले.

दि.२८रोजी कर्जत येथील मराठी मुलांच्या शाळेत कर्जत तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार पवार हे बोलत होते.यावेळी रक्तदान शिबिरासाठी नगराध्यक्ष प्रतिभाताई भैलुमे,         उपनगराध्यक्ष नामदेव राऊत,माजी जि.प.सदस्य प्रवीण घुले,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,पं.स.सदस्य राजेंद्र गुंड,नगरसेवक सचिन घुले,संतोष मेहेत्रे,ओंकार तोटे,नगरसेविका मनीषा सोनमाळी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर,शिवाजीराव फाळके,तात्या ढेरे,डॉ.प्रकाश भंडारी,मंदार काळदाते,जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा,नितिन देशमुख,प्रा.शशिकांत पाटील, कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण आदि उपस्थित होते.

यावेळी मुस्लिम समाजाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेऊन ८१ पिशव्यांचे रक्तसंकलन केले. शिबिर यशस्वीतेसाठी रज़्ज़ाकभाई झारेकारी, माजिद पठाण, कदीरशेठ सय्यद, अय्यूब काझी, शरीफ पठाण, मिनाज सय्यद, अमिन झारेकरी, शरीफ कुरैशी, आफताब सय्यद, नाजिम झारेकरी, जाकिर टेलर, समशेर शेख, अयाज बेग, मुस्ताक,सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे. महिलांकडूनही रक्तदानात सहभाग नोंदविण्यात आला आहे.आनंदऋषिजी रक्तपेढ़ीच्या डॉ.सुनील महानोर, डॉ.शंकर मोरे, डॉ.संजय कोरे यांच्यासह त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यानी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here