Shrigonda : लिंबू व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट; कमाल बाजारभाव देण्यास टाळाटाळ

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील लिंबू व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून पणनच्या कमाल आणि किमान बाजार भावाच्या निम्माही शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची रोज होणारी लूट श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व पदाधिकारी थांबवणार का असा प्रश्न जनमाणसातून विचारला जात आहे. 

श्रीगोंदा तालुका मोठ्या प्रमाणात लिंबू पिकविले जाते त्यामुळे तालुक्याची लिंबाचे आगार म्हणून ओळख आहे तालुक्यात रोज सुमारे लाखो टन लिबू विक्रीसाठी तयार होते मात्र या लिंबाला बाजार मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात निराशा व्यक्त केली जात आहे. त्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला मिळणार अतिशय कमी बाजार आता हा बाजार फक्त व्यापारी वर्गाच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमालीच्या नियोजनाचा आभाव म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
जर आजचे पणन विभागाचे लिंबू बाजारभाव मुंबई किमान दर २५०० प्रती क्वि कमाल दर ३००० सर्वसाधारण दर २८०० रु आहेत. तर तरीही व्यापाऱ्यांच्या साखळीमुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना आजही फक्त ५ ते ६ रु बाजार दिला जातो. मग बाकीचा पैसा नेमका जातो कुठे याचाही श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला अजिबात तपास नाही कारण मागील दोन वर्षांपासून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून लिंबाचा निलाव करण्यात आलाच नाही मात्र आजही कांद्याचा निलाव नेहमी सुरु आहे त्यामुळे लिबू व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्यात मोठ्या प्रमाणात खिचडी शिजत आहे त्यामुळे बाजार समितीच्या सचिवाची दुसरीकडे बदली करा मोठा घोटाळा समोर येईल अशी माहिती एका व्यापाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे.
दोन वर्षांपासून निलावं का बंद ?
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिबू व्यापारी यांचे निलावं दोन वर्षांपासून का बंद आहे याबाबत बाजार समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सनीतले कि लिबू या फळाचे आवक जास्त असल्यामुळे त्याचा निलाव करायचा असतो का हे आम्हाला माहित नसल्यामुळे आजपर्यंत आम्ही लिबांचा निलावं केला नाही असेही मार्केट कमिटी संचालक उमेश पोटे यांनी तहसील कार्यालयात सांगितले.
लिबांचा निलावं आजपासून सुरु 
श्रीगोंदा तालुक्यात बाजारभाव असतानाही लिंबाला बाजार मिळत नसल्याबाबत तहसीलदार यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असता त्यांनी व्यापारी वर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव याची तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत लिंबाचा निलावं आजपासून चालू करण्यात येणार, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी बैठकीत दिली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या पत्रव्यवहाराला यश 
शेतकऱ्यांच्या लिंबाला बाजारभाव मिळत नसलेबाबत संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती तसेच सचिव यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे तहसील कार्यालयात मिटिंग बोलाविण्यात आली. त्यात निळवं करण्याचा तोडगा निघाला त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या पत्रव्यवहाराला यश आले आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here